एक्स्प्लोर
आमदाराच्या गाडीच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धाडणे फाट्याजवळ समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. यात मोटरसायकलवरील दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेले. यावेळी डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
धुळे : साक्रीचे आमदार डी.एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. साक्री पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ आमदार अहिरे यांची इनोव्हा कार आणि बाईकमध्ये समोरासमोर धडक झाली. यात सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले. या घटनेत आमदार डी एस अहिरे जखमी झाल्याचीही माहिती आहे.
साक्री तालुक्यातील मलांजण येथील सोनू दयाराम सोनवणे आणि शांताराम सोनवणे हे दोघे बाईकने साक्री गावाकडे येत होते. धाडणे फाट्याजवळ समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. यात बाईकवरील दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेले. यावेळी डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले.
या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तर संतप्त ग्रामस्थांनी काही काळ रास्ता रोको केला. साक्री विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार डी एस अहिरे देखील जखमी झाले आहेत. आमदाराच्या गाडीच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement