एक्स्प्लोर

... तर MIMचे 20 आमदार निवडून येतील, धुळ्याच्या आमदाराचा दावा

फारुख शाह यांनी धुळे विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार अनिल गोटे, महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांचा पराभव केला. आमदार डॉ. फारुख शाह यांनी या निवडणुकीत तीन हजार मताधिक्‍याने विजय मिळविला.

धुळे : मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात एमआयएमचे 20 उमेदवार निवडून येतील, असा विश्वास धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सपोर्ट करून पक्षाच राजकीय मरण ओढवून घेतलं आहे, असेही शाह यावेळी म्हणाले. शाह यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे भाजपचीच खेळी आहे. महाशिवआघाडीचे हे सरकार अस्थिर सरकार असेल, केवळ तीन ते चार महिने हे सरकार असेल. पुन्हा भाजपचेच सरकार बसेल. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला सपोर्ट केल्यानं अल्पसंख्यांक समाज यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असेही ते म्हणाले. आता 'जिसकी लाठी उसकी भैस' अशी स्थिती आहे. भाजपकडे सत्तेची पॉवर आहे. हा सगळा खेळ भाजपचाच आहे. 15 दिवसाच्या आत ही राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल, असेही शाह म्हणाले. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार अस्थिर असेल, हे सरकार केवळ तीन-चार महिन्यांचे असेल. त्यानंतर भाजपचेच सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले. सत्तापॉवर भाजपकडे असल्यामुळे राज्यपालांनी देखील शिवसेनेला कमी वेळ दिला. भाजपला आम्ही कधीच पसंती दिलेली नाही. सरकार स्थापनेसाठी दोन मतांची गरज असेल त्यावेळीही आम्ही भाजपला मतं देणार नाही, आम्ही विरोधातच बसू, असेही ते म्हणाले. राज्यात एमआयएमचे दोन आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. फारुख शाह यांनी धुळे विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार अनिल गोटे, महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांचा पराभव केला. आमदार डॉ. फारुख शाह यांनी या निवडणुकीत तीन हजार मताधिक्‍याने विजय मिळविला. सर्वप्रथम काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आमदार डॉ. शहा हे माजी आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम संघटनेतर्फे नगरसेवक, नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उपमहापौर झाले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमतर्फे पहिल्यांदा नशीब अजमावले. त्यात त्यांनी बाजी मारली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget