Gopinath Munde Birth Anniversary : 'काळीज जड होतंय; अप्पा, मी तुमचा शब्द पूर्ण करणार', धनंजय मुंडे भावूक
धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडेंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त विविध स्तरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. कन्या पंकजा मुंडे (pankja munde ) यांनीही जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर करण्यात आलेल्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना धनंजय मुंडे खूपच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर बीड मध्ये गोपीनाथ गडावर आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यासाठी गोपीनाथ गडावर सजावट केली जाते. देशभरातून लोक गोपीनाथ गडावर येत असतात. त्यामुळे गडावर जोरदार तयारी केली जाते. याच तयारीचे फोटो पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
"12 dec "गोपीनाथ गड ' तुमचा नेता आणि माझा पिता...सजला वंचितांचा 'गोपीनाथ गड' आपल्या गोतावळ्या साठी" असे कॅप्शन देऊन गोपीनाथ गडाचे फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहेत. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडेंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सजला वंचितांचा 'गोपीनाथ गड' आपल्या गोतावळ्या साठी pic.twitter.com/yEsNJ7BJtJ
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 10, 2021
12 dec "गोपीनाथ गड ' तुमचा नेता आणि माझा पिता... pic.twitter.com/HqMBLEzDCs
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 11, 2021
"अप्पा... तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. स्व. अप्पांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..." असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
अप्पा... तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जयंती, पुण्यतिथी असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती असल्याचे जाणवते. ऊसतोड कामगार कल्याणाच्या तुमच्या शब्दाला मी पूर्ण करणार हा शब्द देतो. स्व. अप्पांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन... pic.twitter.com/7zlUFdeLuT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 11, 2021
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांना राजकीय क्षेत्रातील अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. "संघर्षयोद्धा ! आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !" असे ट्विट फडवीस यांनी केले आहे.
संघर्षयोद्धा !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/o68uVkMgPS
"भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता लोकनेता गोपीनाथ मुंडे जी को जयंती पर विनम्र अभिवादन।" असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता लोकनेता गोपीनाथ मुंडे जी को जयंती पर विनम्र अभिवादन। pic.twitter.com/iwcjjd4cV9
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 12, 2021
संबंधित बातम्या
Gopinath Munde Birth Anniversary | आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती, भाजपसाठी आयुष्य वेचलेला नेता
12 डिसेंबरला काय संकल्प करणार? पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र