12 डिसेंबरला काय संकल्प करणार? पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) यांचं एक पत्र सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं आहे.
![12 डिसेंबरला काय संकल्प करणार? पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र BJP leader Pankaja Munde Letter to Party workers gopinath munde birth anniversary 12 डिसेंबरला काय संकल्प करणार? पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/09/a1824e9fcf33189b05465a5961e938d7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde Letter Viral) यांचं एक पत्र सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालं आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हे पत्र लिहिलं आहे. कार्यकर्त्यांना उद्देशून 'तुम्ही आता 12 डिसेंबरला कोणता संकल्प करणार?' असे आवाहन करणारे भावनिक पत्र पंकजा मुंडे यांनी लिहिले आहे. हे पत्र टाईप केलेलं नसून स्व हस्ताक्षरात पंकजा मुंडे यांनी लिहिलं आहे. लाल रंगाच्या शाईनं हे पत्र लिहिलं असून त्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
पंकजा मुंडे यांचे पत्र
पत्रात पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे, गुरू, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं! या 12 डिसेंबरला एक संकल्प घ्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य?
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी दरवर्षी गोपीनाथ गडावर ती सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी नेमका कोणता संकल्प केला जाणार याच्या विषयी उत्सुकता पाहायला मिळते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)