एक्स्प्लोर
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त नागपुरात लोटला भीमसागर
नागपूर: साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात भीम बांधवांचा जनसागर उसळला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला.
14 ऑक्टोबर 1956 रोजी विजायदशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून दरवर्षी विजयादशमीला देशभरातून लाखो लोक दीक्षाभूमीवर दर्शनासाठी येतात.
दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. इथल्या भव्य बौद्ध स्तूपात बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी जय भीमच्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून निघला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement