एक्स्प्लोर
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक-सुरक्षारक्षकांमध्ये दर्शनावरुन मारहाण

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दर्शन घेण्यावरुन भविकांची सुरक्षारक्षकात वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोन ते तीन भाविकांसह सुरक्षारक्षकही जखमी झाले आहेत. याआधीही भाविकांना मंदिरात कुठल्या ना कुठल्या कारणाने मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
धक्कादायक म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिरात मारहाण करणारा भाविक लष्करी जवान असून, त्याने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात हेल्मेट घातला. त्यामुळे सुरक्षारक्षक रक्तबंबाळ झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत भाविक असलेला लष्करी जवानही जखमी झाला. दरम्यान, सुरक्षारक्षकाला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement



















