एक्स्प्लोर
'दारु नव्हे तर पिण्याचं पाणी प्राथमिकता', मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना टोला
जालना: 'दारुच्या कारखान्यांसाठी नाही तर पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.' ते काल जालन्यामधल्या कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे पंकजा मुंडेंना टोलाच आहे.
शनिवारी पंकजा मुंडे यांनी उद्योगांचं आरक्षित पाणी तोडता येणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर टीका होताच पिण्याच्या पाण्याचीच प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पाण्याच्या मुद्यावरुनच सरकारमध्ये एकमत नसल्याचं दिसतं आहे. शिवाय यावेळी लातूरला केलेल्या पाणी पुरवठ्याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दरम्यान, मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवण्याच्या मुद्यावरून टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे काल माध्यमांवर भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडेनी केला. पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला.
काल पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पंकजा मुंडेंचा पारा चढला. 'मी काही बोलणार नाही, तुम्ही शुटींग बंद करा' अशी तंबी पंकजा मुंडेंनी दिली. ऐन दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना उद्योगांसाठी राखीव असलेलं पाणी दारूच्या कारखान्यांना देण्यात काहीच गैर नाही. असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement