धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री निर्णय घेतील, आता फडणवीस म्हणतात....
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील काही नेतेही करत आहेत.

मुंबई : बीडमधील सरपंच हत्येनंतर एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असताना, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार काय बोलले याची माहिती घेतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्याबाबत जेवढी माहिती मला आहे तेवढी माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार काय बोलले ते मला माहिती नाही. ते काय बोलले याची माहिती देईन आणि त्यावर प्रतिक्रिया देईन.
मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा धनंजय मुंडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या रडारवर आहेत. दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकारला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा आहे मात्र निर्णय़ कोण घेणार यावरुन टोलवाटोलवी सुरू असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.
आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी ही माहिती दिली. तसंच विष्णू चाटेच्या मोबाईल मधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे. या प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे. केज येथील शासकीय विश्रामगृहात धनंजय देशमुख यांनी यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय देशमुखांनी ही माहिती दिली.
... तर पंकजांनाही राजीनामा द्यावा लागेल
न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले होते. त्यावर त्यांचा मुलगा सिशिवने धनंजय मुंडेंची बाजू घेतली होती. त्यानंतर करुणा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं. आपला मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला. मुलाला माझ्याविरोधात बोलण्यासाठी उभं केल्याचा आऱोपही त्यांनी धनंजय मुंडेंवर केला. आपण जास्त काही बोललो तर धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल असं करुणा मुंडें म्हणाल्या.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
