एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर; संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्वाची माहिती समोर

Santosh Deshmukh Murder Case: देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली.

Santosh Deshmukh Murder Case बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी काल (7 फेब्रुवारी) सीआयडी अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. यादरम्यान धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी चौकशीसंदर्भात चर्चा केली. तसेच तपासामध्ये अडसर ठरणाऱ्या गोष्टींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच विष्णू चाटेच्या (Vishnu Chate) मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीने शोधला आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र तपास समाधानकारक सुरू आहे, असं मतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुख काय म्हणाले?

संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडसर ठरत असतील त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घ्यावी, ही विनंती अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिलेली आहे. धनंजय देशमुख यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेतली. तपासाच्या अनुषंगाने चर्चा झाली, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. 

लवकरच उज्वल निकम यांची नियुक्ती होणार-

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थांनी भाजपा आमदार सुरेश धस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आतापर्यंत झालेल्या तपासासंदर्भात चर्चा करण्यात आली. आम्ही दोघांनी चर्चा केली असून या प्रकरणात कोणताही कसूर राहू नये. यात कोणीही सुटता कामा नये अशी चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख याला सर्व ओळखायचे माझ्या पक्षातील तो बूथ प्रमुख होता. त्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने हत्या केली. त्यात कोणताही कसूर राहू नये. यावर चर्चा केली आहे. तर उद्या किंवा परवा उज्वल निकम यांची ऑर्डर निघेल, अशी माहिती भाजपचे आमदार सुरेध धस यांनी दिली. तसेच अशोक मोहिते गंभीर आहे. त्याच्यावर ज्यांनी वार केले त्याला सुट्टी देणार नाही. अशोकला संतोष देशमुखांचे व्हिडीओ का पाहतो यामुळेच मारले. एवढी मस्ती आणि माज आकाच्या लोकांचा गेला नसल्याचं, सुरेश धस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray : सहा खासदार सोडून जाणार असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 22 July 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शक्तिशाली शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! शक्तिशाली शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Balasaheb Thorat : आज दुसऱ्याचं घर जळतंय उद्या तुमचं घर जळू शकते, लोकशाही वाचवण्याचा संग्राम पुन्हा सुरु झालाय : बाळासाहेब थोरात
आज दुसऱ्याचं घर जळतंय उद्या तुमचं घर जळू शकते, लोकशाही वाचवण्याचा संग्राम पुन्हा सुरु झालाय : बाळासाहेब थोरात
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget