एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : महाराष्ट्रात महिला सुरक्षित, रात्री 12 वाजताही फिरताना महिलांना सेफ्टी वाटतं; देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी

Devendra Fadanvis On Women's Safety : महाराष्ट्रात महिला या एकदम सुरक्षित असून राज्यातील गुन्ह्यांच्या संख्येमध्येही मोठी घसरण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुंबई: महाराष्ट्र हा गुन्ह्यांच्या बाबतीत देशात 20 व्या क्रमांकावर आहे, राज्यातील महिला सुरक्षित असून मुंबईत रात्री 12 वाजताही महिला सुरक्षित फिरतात अशी माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधान परिषदेत दिली. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती काय आहे याची आकडेवारी फडणवीसांनी माडंली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadanvis On Women's Safety) 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत रात्री 12 वाजता फिरताना महिलांना जी सेफ्टी वाढते ती दिल्लीत वाटत नाही. राज्यात 3 लाख 94 हजार गुन्हे घडले होते आता त्यात 20 हजाराची कमी आली आहे. गुन्ह्यांच्या बाबत आपण देशात आठव्या क्रमांकावर आहोत. खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. महिलांवरील गुन्ह्याच्या बाबत देखील आपण मागे अहोत. बलात्काराच्या संदर्भात 16 व्या क्रमांकावर आहोत. अपहरण संदर्भात विचार केला तर आपण नवव्या क्रमांकावर आहोत. 

महिला अत्याचार प्रकरण हातळण्यासाठी आपण व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीकडे वळला आहे अशी परिस्थिती नाही. नर्कोटिक्स मध्ये 2020 साली 5 हजार 300 आरोपी वर कारवाई केली आहे. मागील 2 वर्षांत आपण 24 हजार आरोपींवर कारवाई केली आहे. मुंबईत 2 हजार 400 पान टपऱ्या आपण नष्ट केल्या आहेत.  नागपूरमध्ये ड्रग फ्री नागपूर अशी मोहीम राबवली. यामध्ये 1150 ड्रग पेडलर पकडले आहेत. 

ललित पाटील प्रकरणात खुलासा आधीच केला आहे. ललित पाटील याचा कारखाना 2020 साली सुरू करण्यात आला होता. अमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी आपण सर्व युनिटला सूचना दिल्या आहेत. मागील 8 महिन्यात 8 हजार आरोपी ताब्यात घेतले आहेत. 1167 नव्या कारवाया आपण केल्या 967 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. हुक्का पार्लर वर कडक कारवाई केली जाईल. 

पोलीस भरती केली, पोलीस दलाचा तणाव कमी केला

राज्यातील पोलीस पदे रिक्त होती. 23 हजार पदे आपण भरली आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाची मर्यादा वाढवली आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण आता नव्याने आकृतीबंध करत आहोत. 187 नवी पोलीस ठाणे निर्माण करण्याला आपण परवानगी दिली आहे. 329 कोटी रूपयांची मंजुरी देखील दिली आहे. पोलीस दलाचा तणाव कमी करण्यासाठी आम्ही विविध योजना केल्या आहेत. 55 वर्ष वरच्या पोलिसांना 8 तास करावी अशा सूचना दिल्या आहेत. 

महिला आणि मुलींच्या बाबत एक चर्चा समोर आली आहे. 2020 साली 4 हजार 517 मुली आणि 63 हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या.  मुलीच्या प्रकरणात आपला तपास 90 टक्के आहे तर महिलांच्या बाबत आपलं डीटेक्शन हे 86 टक्के आहे. 

नागपूरबाबत माहिती द्यायची आहे की मागील आठ महिन्यात 338 मुली बेपत्ता झाल्या आहेत यातील केवळ 12 मुलींचा शोध लागणे बाकी आहे. बाकी सर्व मुली मिळाल्या आहेत. 67 हजार महिला आणि पुरुष यांचा तक्रारी पोलिसांनी ऐकून घेतल्या आहेत. तसेच वृद्ध नागरिकांच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. 

वर्धा आणि गडचिरोलीमध्ये दारू एक्सपोर्ट होते अशी माहिती विरोधी पक्षनेते यांनी दिली. आपण याठिकाणी करवाई वाढवत आहोत. सायबर गुन्ह्यांच्या बाबत आपण एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. यामधे बँकिंग, सोशल आशा विविध क्षेत्रातील लोकांना आपण एका ठिकाणी आणून क्विक रिस्पॉन्स साठी प्रयत्न करत आहोत.

मधल्या काळात जे सरकार होते त्यांनी विदर्भात अधिवेशन घेतलं नव्हतं. या अधिवेशनात आमची अपेक्षा होती की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव येईल मात्र तसं झालं नाही. आमच्याकडे मंत्र्यापेक्षा महामंत्री पॉवरफुल असतो. आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल सांगता येणार नाही. प्रत्येकाचे अच्छे दिन येणार आहेत. प्रत्येकाने अपेक्षा ठेवायची आहे

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget