एक्स्प्लोर
पनवेल मनपा निवडणूक : काय आहेत पनवेलची राजकीय गणितं?
![पनवेल मनपा निवडणूक : काय आहेत पनवेलची राजकीय गणितं? Details Of Panvel Municipal Corporation Election Latest Updates पनवेल मनपा निवडणूक : काय आहेत पनवेलची राजकीय गणितं?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/27201232/panvel-palika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पनवेल (रायगड) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 मे रोजी मतदान असून, 26 मे रोजी निकाल लागणार आहे. आठवड्याभरात मतदान असल्याने राजकीय पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची राजकीय गणितं काय आहेत, यावर एक नजर टाकूया :
पनवेल ‘महापालिकेची’ पहिलीच निवडणूक
पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका असून, गेल्याच वर्षी म्हणजे 2016 साली अस्तित्वात आली. काही गावांच्या तसंच खारघरच्या समावेशावरुन झालेला वाद गाजला. मात्र, अखेर पनवेल नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर झालं. त्यामुळे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.
सर्वच महत्त्वाचे राजकीय पक्ष रणांगणात
पनवेल महापालिकेची सध्याची उलाढाल अंदाजे एक हजार कोटी रुपये आहे. येत्या काळात हा आकडा झपाट्यानं वाढणार असल्यानं सर्व पक्षांची नजर आहे. म्हणूनच राज्यातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
2019 साली राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. याच निवडणुकांची रंगीत तालिम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
आधी शेकापमध्ये, त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेसाठी मोठी कसरत सुरु केली आहे. त्यामुळे ठाकूर पिता-पुत्र (प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर) आणि शेकापच विवेक पाटील यांच्यात पारंपरिक संघर्ष आहे.
पनवेल महापालिकेची थोडक्यात आकडेवारी :
- पनवेल महापालिकेत एकूण जागा - 78
- बहुमतासाठीचा आकडा - 40 जागा
- एकूण प्रभाग – 20
- एकूण उमेदवार - 418
- मतदार - अंदाजे सव्वा चार लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)