एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
अहमदनगरमधील पाथर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत मध्यस्थी करायला गेलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सचिन पवार असं मृत तरूणाचं नाव आहे.
अहमदनगर : अहमदनगरमधील पाथर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाणीत मध्यस्थी करायला गेलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सचिन पवार असं मृत तरूणाचं नाव आहे.
बुधवारी अवैध प्रवासी वाहतुकीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यावेळी सचिन पवार त्या दोन गटात मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी सचिनच्या डोक्यातही लाकडी दांडके आणि दगडानं हल्ला करण्यात आला होता.
यानंतर गंभीर जखमी झालेल्या सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शुक्रवारी पहाटे सचिनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सचिनच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तौनात ठेवला होता.
दुसरीकडे सचिनच्या नातेवाईकांनीही या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement