एक्स्प्लोर
गव्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्यासह वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाला आहे. यात एका शेतकऱ्यासह वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचाही समावेश आहे.
उसाचा पाला काढण्यासाठी तीन मित्र शेतात गेले होते. तेव्हा कळपातून वाट चुकलेला एक गवा तिथे आला.आणि उसाचा पाला काढणाऱ्या अनिल पोवार या तरुण शेतकऱ्यावर त्यानं हल्ला केला. गव्याची शिंगं पोटात घुसून अतिरक्तस्त्रावानं अनिल पोवारांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत उरलेल्या दोन मित्रांनी गावात माहिती दिली. ती कानावर पडताच घटनेचं वार्तांकन करण्यासाठी स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रघुनाथ शिंदे तिथे पोहचले. बांधावर उभं राहून गव्याचं चित्रिकरण करत असतानाच या गव्यानं मागे फिरुन थेट शिंदेंना उडवून लावलं.
गव्याच्या धडकेनं 10 ते 12 फूट उंच उडालेले शिंदे गंभीर जखमी झाले. शिंदेंवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचाही मृत्यू झाला.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement