शाळेसमोरील दारू दुकान हटविण्यासाठी आमरण उपोषण
वीस वर्षापूर्वी हे देशी दारुचे दुकान सुरु झाले होते. त्या वेळी ग्रामपंचायत कामरगावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी देशी दारुचे दुकान चालू करण्यासंदर्भात नाहरकत प्रमाणपत्र दिले होते.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद महाविद्यालयासमोरील मुख्य चौकामधील दारूच दुकान हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश इंगळे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
वीस वर्षापूर्वी हे देशी दारुचे दुकान सुरु झाले होते. त्या वेळी ग्रामपंचायत कामरगावच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी देशी दारुचे दुकान चालू करण्यासंदर्भात नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. शाळेपासून अवघ्या 200 मीटरच्या आत असलेल्या परिसरात देशी दारुचे दुकान थाटण्यात आले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि पालक यांना मोठा त्रास होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे दुकान हटवण्याकरता मागणी केली जात आहे. मात्र उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा मागणी करून दुकानचं अंतर जास्त जुन्या नकाशाप्रमाणे दाखवून हे दुकान जैसे थे आहे. त्याकरता गेल्या पाच दिवसापासून हे आमरण उपोषण केले जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव हे गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाच्या आजूबाजूने लहान-मोठे 35 ते 40 खेडे लागले आहेत. त्या खेड्या गावातील विद्यार्थींना कामरगाव येथील जिल्हा परिषद नावलौकिक शाळेमध्ये शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येत असतात. ही शाळा वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या इतर शाळेच्या तुलनेत मोठी जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेमध्ये पाचवी ते बारावी या वर्गांमधील विद्यार्थी शिकत असते. जवळपास अंदाजी दरवर्षी हजार ते बाराशे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेत आहे. या शाळेच्यासमोर देशी दारूचे दुकान असल्या कारणाने अनेक विद्यार्थी हे व्यसनाधीन होत आहे.
देशी दारुच्या दुकान हटवून व्यसनाधीनांपासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हे देशी दारूचे दुकान हटवण्याकरता लढा 2010 पासून सुरु झाला. 2010 साली गावातील महिलांनी दारूच दुकान हटविण्यासाठी आंदोलन केले आणि उत्पादन शुल्क विभागाला आडवी बाटली उभी बाटली बद्दलची निवडणूक घ्यावी लागली. त्या वेळेस महिलेचा यामध्ये विजय झाला. न्यायालयात प्रकरण गेले आणि दुकान जैसे थे राहिले. त्यामध्ये दुकान सुरु राहण्यासाठी उत्पादन शुल्काला मोठी मदत मिळाल्याच बोलले जात आहे. त्यानंतर 2019 मध्ये विनोद नंदागवळी यांनी ही दुकान हटविण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र मोजणीमध्ये तफावत आणून उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रेत्याची पाठराखण केली.
त्यानंतर 11 ऑगस्ट 2020 त्यादिवशी उपोषण करता प्रकाश इंगळे त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर तहसीलदारांनी मिटिंगमध्ये बोलावून पंधरा दिवसात दुकान हटवण्याच्या आश्वासन दिले होते. अर्जात नमूद केले. तरी सुद्धा आजपर्यंत देशी दारूचे दुकान हटले नसल्यामुळे प्रकाश इंगळे हे आमरण उपोषणाला बसले आहे. आता तरी प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने नागरिकाचे भविष्य बघता दुकान हटविण्यासाठी मेहर नजर करावी एवढीच माफक अपेक्षा गावकरी करत आहे.
























