इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं, असे एक भाषण दाखवा; देवेंद्र फडणवीसांचे मविआला आव्हान, म्हणाले....
मविआचे आंदोलन शुद्ध पद्धतीने राजकीय आंदोलन आहे. लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतलं असे इंदिरा गांधी यांचं एक तरी भाषण दाखवाव, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मविआला आव्हान दिले आहे.
Nagpur News नागपूर : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) हे आंदोलन पूर्ण शुद्ध पद्धतीने राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीला माझा सवाल आहे की त्यांनी लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेतलं असे इंदिरा गांधी यांचं एक तरी भाषण दाखवाव, पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार का? इतके वर्ष काँग्रेसने शिवाजी महाराजांनी (Shivaji maharaj) सुरत लुटलं असा इतिहास शिकवला, शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, मात्र जाणीवपूर्वक आम्हाला तसा इतिहास शिकवण्यात आला. त्याबद्दल हे लोक माफी मागणार का? मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर ने हटवण्याचे पाप काँग्रेसने केलं, त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस आणि महाविकस आघाडीवर निशाणा साधलाय.
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Shivaji statue collaps) मविआ (Maha Vikas Aghadi) आज राज्यभर जोडे मारो आंदोलन करणार आहे. दरम्यान, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. दरम्यान, या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाहीये. तर मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहेत. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. मविआच्या याच आंदोलनावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकस आघाडीवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
काँग्रेसने पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुडवला, हटवला गेला, त्याकरिता काँग्रेस माफी मागणार का? महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे आंदोलन करत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली, शिवप्रेमींची माफी मागितली त्यानंतरही राजकारण करणे हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. हे आंदोलन निव्वळ शुद्ध राजकारण आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला त्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अगोदर माफी मागितली पाहिजे. शरद पवार स्वतः संरक्षण मंत्री असताना त्यांनी नेव्हीला कटघऱ्यात उभ करून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे, हे त्यांना तरी मान्य आहे का? पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या