![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी : परमबीर सिंहांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा, म्हणाले, मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली!
मविआने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली असून माझ्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले. यांचे पुरावे मी सीबीआयला दिले आहे. आजही अनेक पुरावे माझ्याकडे असल्याचा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
![मोठी बातमी : परमबीर सिंहांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा, म्हणाले, मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली! dcm Devendra Fadnavis big claim on Parambir Singh s interview on abp majha serious allegations on Maha Vikas Aghadi at nagpur maharashtra politics marathi news मोठी बातमी : परमबीर सिंहांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा, म्हणाले, मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/3287c87b1d2b0dfd22cf212cb021963c1723275053689892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा केलेला आरोप खरा असल्याचे म्हटलं आहे. परमबीर सिंह यांनी काल (9 ऑगस्ट) अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी केलेल्या आरोपानंतर एबीपी माझाशी बोलताना देशमुखांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला होता. याच मुद्द्याला घेऊन आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया देत परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खरे असल्याचा दावा केला आहे.
माझ्या अटकेसाठी मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली! - देवेंद्र फडणवीस
माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती. मात्र, आम्ही त्याचा वेळीच पर्दाफार्श करु शकलो. मी, प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची यात सुपारी दिली होती. पण काही चांगल्या अधिकार्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला. माझ्यावर खोट्या केस दाखल करण्यासंदर्भात परमबीर सिंह यांनी एक इन्सिडन्स सांगितला. पण माझ्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले, पण त्यांना काही मिळालं नाही. यांचे व्हीडीओ पुरावे सीबीआयला दिले आहे. आजंही आमच्याकडे अनेक व्हीडीओ पुरावे असल्याचा खळबळजनक दावाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
काय म्हणाले होते परमबीर सिंह?
परमबीर सिंह यांनी काल (9 ऑगस्ट) अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी केलेल्या आरोपानंतर एबीपी माझाशी बोलताना देशमुखांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला होता. यावेळी परमबीर सिंह म्हणाले होते की, सुशांत सिंह प्रकरणामध्ये बॉलिवूडवर दबाव टाकण्यात सांगण्यात आल्याचा आरोप सिंग यांनी केला. दरम्यान, परमबीर सिंह यांनी थेट मातोश्री आणि सिल्वर ओकचा उल्लेख करत या प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला.
सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार-ठाकरे
गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख असले, तरी त्यांच्या मागे पवार-ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप केला.परमबीर सिंह यांनी सलील देशमुख (अनिल देशमुख यांचे चिरंजीव) हॉटेल ललितमध्ये बसून डील करत होते, असा आरोपही केला. ते म्हणाले की पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये विरोधी नेत्यांना अडकवण्यासाठी दबाव आला होता असा सुद्धा आरोप परमबीर सिंह यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. जयकुमार रावल यांनाही अडकवण्यासाठी बैठक घेण्यात आलाचा दावा परमबीर सिंह यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)