एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुसऱ्या महायुद्धातील डॅकोटा विमान जगभ्रमंतीवर, नागपुरात थांबा
नागपूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आठवणी घेऊन डॅकोटा विमान नुकतंच नागपूरच्या विमानतळावर उतरलं. दुसऱ्या महायुद्धात ज्या विमानाने मित्रराष्ट्रांवर हल्ले केले, त्याच डॅकोटा विमानांच्या ताफ्यातल्या विमानात बसण्याचा मान मिळाला नागपूरच्या काही खास व्यक्तींना.
1935 साली डग्लस एअरक्राफ्ट कंपनीनं या विमानाची निर्मिती केली. आताच्या सुपरसॉनिक विमानांप्रमाणे ना यात कोणतीही उपकरणं आहेत, ना अत्याधुनिक नॅव्हिगेशन सिस्टीम. खिडक्या तर लाकडाच्या... ऑक्सिजनचीही सोय नाही. त्यामुळे विमान जितक्या उंचीवर तितके ऑक्सिजन कमी.
यात एकूण 36 जणांना वाहून नेण्याची क्षमता आहे. सैन्याला युद्धभूमीवर सोडणं आणि बॉम्बवर्षाव करणं, यात या विमानाचा हातखंडा होता. जपानने आपली सर्व डॅकोटा विमान नष्ट केली, मात्र जगभ्रमंतीवर निघालेलं सर्वात जुनं डॅकोटा विमान एका फ्रेंच व्यक्तीच्या मालकीचं आहे.
असं हे जुन्या जमान्यातलं विमान घेऊन दोन पायलटनी जगभ्रमंतीचा बेत आखला आहे. 9 मार्च रोजी स्वित्झर्ल्डंमधून या विमानानं उड्डाण केलं. विविध देशात भेटी देत या विमानानं नागपुरात हजेरी लावली. हा प्रवास 24 हजार नॉटिकल माईल्सनंतर आणि 55 थांब्यांनंतर जिनेव्हात संपणार आहे. ब्रीटलिंग घड्याळ कंपनीने ही भ्रमंती स्पॉन्सर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement