एक्स्प्लोर

LIVE : मुंबईत दहीहंडीत 71 गोविंदा जखमी

मुंबई : मुंबईसह देशभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे. सुप्रीम कोर्टाने 20 फुटांपेक्षा अधिक उंची आणि 18 वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीत बंदी घातली आहे. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी या निमयमाचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे.   मुंबई - ठाण्यातील दहीहंडी देशभरात प्रसिद्ध आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर यांची , घाटकोपरमध्ये मनसे आमदार राम कदम  ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती,  शिवसेना आमदार रवींद्र फाटक - संकल्प दहीहंडी,  टेंभीनाका - एकनाथ शिंदे, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट - खासदार राजन विचारे या दहीहंडी प्रसिद्ध आहेत.   नौपाड्यात मनसेची 40 फुटांवर हंडी सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाल न जुमानता मनसेनं ठाण्यातल्या नौपाड्यात तब्बल ४० फुटांवर हंडी बांधली आहे. कायदाभंग असं या हंडीला नाव देण्यात आलं असून 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मनसे ही हंडी फोडणार की त्याआधी पोलीस त्यावर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे.   चेंबूरमध्ये प्रशासनाकडून मार्किंग तिकडे चेंबूरमध्ये मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र 20 फुटांची मर्यादा पाळायला मनसेने नकार दिल्यामुळे प्रशासनाने या ठीकाणी 20 फूटापर्यंत मार्किंग करुन ठेवलं आहे. मनसेच्या दहीहंडीची उंची मोजण्यासाठी पोलिसांनी हे मार्किंग गेल्याचं समजतंय. त्यामुळे यादरम्यान मनसे नियमांचं उल्लंघन करतंय की नाही याकडे पोलिसांची करडी नजर असणार आहे.   डोंबिवलीतही नियमाचं उल्लंघन सर्वोच्च न्यायालयाने 20 फुटांच्यावर दहीहंडी खेळण्यास निर्बंध घातल्यानंतरही डोंबिवलीत या नियमांचं उल्लंघन झालं आहे. डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने  5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त सलामी दिली.   दरम्यान या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कुमार आवटे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला आदर असला तरीही आमचं स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ नये असं या मंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळे नवसाई पथकातले गोविंदा आज सात थर लावणार आहेत, असं आवटे यांनी सांगितलं.   साईदत्तची 20 फुटांची हंडी काही मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात एल्गार पुकारला असला, तरीही काही मंडळांनी न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांमध्येच सण साजरं करायचं ठरवलंय. दादर परिसरातल्या साईदत्त मंडळाने नियमांप्रमाणे दहीहंडी साजरा करत 20 फुटांच्या आतच हंडी बांधली आहे.   काही मंडळं आणि राजकिय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळायला नकार दिला होता. अशा आयोजकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचेही संकेत दिलेत. त्यामुळे पोलिस कारवाई टाळण्यासाठी काही पथकांनी 20 फुटांच्या आतच हंडी बांधायचं ठरवलं आहे. LIVE : मुंबईत दहीहंडीत 71 गोविंदा जखमी डोळ्यावर पट्टी बांधून हंडीला सलामी दरम्यान आजच्या दिवशी अनेक गोविंदा पथक वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करतायत. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. आपल्या सरावाचं कसब दाखवण्यासाठी गोविंदा पथकाने ही सलामी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीरPanchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्दMumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणीABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget