एक्स्प्लोर

Dahi handi 2021 : यंदाही दहिहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय

यंदाही दहिहंहीला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री आणि दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Dahi handi 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक सध्या सुरु आहे. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहिदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही. 

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना."

"बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलनं तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोटं आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीनं वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगानं जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्यानं वाढवलेली नाही.", असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

"आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.", असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काय मागण्या केल्या होत्या? 

1. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
2. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
3. गोविंदा पथक हे दुसरीकडे कुठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. 
4. कोविड-19 संसर्गाची जाणीव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
5. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget