एक्स्प्लोर

सलग पाच वर्षे ‘प्रेझेंट मिस’, डहाणूतील चिमुरडीचा अनोखा विक्रम

डहाणू : चिमुरड्यांना अनेकदा शाळेला दांडी मारावीशी वाटते. मग पोटदुखी किंवा तब्येत बिघडल्याची कारणं देत शाळेत जाण्याचा कंटाळा करतात, तर काहीजण अभ्यासात गोडी नसते, गुरुजी-बाईंचा धाक, अपूर्ण गृहपाठ अशीही कारणं देत विद्यार्थी गैरहजर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या सर्व गोष्टींना बाजूला सारत डहाणूच्या ययाती गावड या विद्यार्थिनीने अनोखा विक्रम नोंदवला आहे. ययातीने गेल्या पाच वर्षात शाळेला एकही दिवस दांडी न मारता शंभर टक्के हजेरी लावली आहे. तिने हा राष्ट्रीय विक्रम करुन, महाराष्ट्रात तसेच ग्रामीण विभागात पहिली येण्याचा मान मिळवला आहे. ययाती देशात दुसरी आली असून, तिने या यशाचं रहस्य नियमीत व्यायाम, योगा आणि घरच्या आहाराला दिले आहे. डहाणूतील चिखले गावातील दहा वर्षीय ययाती शैलेंद्र गावड या विद्यार्थिनीने शंभर टक्के उपस्थिती दर्शवत अनोख्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. ती दुसरी ते सहावी या वर्गात शिक्षण घेत असताना एकही दिवस गैरहजर राहिली नाही. तिच्या यशाची नोंद इंडियन वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्याच प्रयत्नही सुरू असून, ती राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण विभागात प्रथम तसेच शहरी आणि ग्रामीण संयुक्त विभागात देशात दुसरी आली आहे. ययातीने 2012-13 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षांत सतत पाच वर्षे शंभर टक्के उपस्थित राहून हजेरीचा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2012-13 ते 2014-15 या तीन वर्षांत डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट प्राथमिक शाळा येथे दररोज 16 किलोमीटरचा प्रवास खासगी वाहनाने करून तिने एकही सुट्टी न घेता शिक्षण घेतले. तसेच 2015-16 ते 2016-17 या दोन वर्षांत बोर्डी येथील एस.पी.एच.हायस्कूल येथे रोजचा 16 किलोमीटरचा एसटीने प्रवास करून, तिने हा पराक्रम केला. अभ्यासाबरोबरच खेळ आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही अव्वल असणारी ययाती शाळेत, गावात, मित्र-मैत्रिणी व कुटुंबामध्ये सर्वांची लाडकी आहे. तिच्या या कर्तृत्वाने डहाणू तालुक्याचे व पर्यायाने राज्याचं नाव ही उंचावलं आहे. या विक्रमाबद्दल तिचे सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे. ययातीच्या या यशाच रहस्य तिचा नियमित व्यायाम, योगा आणि घरचा आहार हे आहे. यामुळेच ती नेहमी फिट राहते. बाहेरचं अन्न खाण्यापेक्षा घरातलं जेवणं खा, असंही ययतीने तिच्या मित्र-मैत्रिणींना आवाहन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget