एक्स्प्लोर
सायबर पोलिसांनाच लाखोंचा गंडा घातला
नाशिकच्या पोलीस अकादमीमधील काही प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे 12 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात एका पीएसआयच्या नावाने बँकेत बनावट कागदपत्र सादर करत पैसे काढण्यात आले आहेत.

नाशिक : महाराष्ट्रातील पोलिसांचं प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकच्या पोलिस अकादमीमध्ये चक्क सायबर सेक्युरिटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसांनाच गंडा घातल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या पोलीस अकादमीमधील काही प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे 12 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फेब्रुवारी 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात एका पीएसआयच्या नावाने बँकेत बनावट कागदपत्र सादर करत पैसे काढण्यात आले आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी बँक किंवा पोलीस अकादमीशीच संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांना सायबर सिक्युरिटीच प्रशिक्षण देणाऱ्या अकादमीतच हा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक























