एक्स्प्लोर

Cidco My Homes Lottery : सिडकोकडून अंतिम यादी प्रकाशित, तुमचं नाव यादीत कसं शोधणार? सोडत कुठे आणि कधी? जाणून घ्या वेळ अन् ठिकाण

Cidco Homes Lottery : सिडकोनं माझे पंसतीचे सिडकोचे घर योजनेच्या अर्जदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीला सोडत होणार आहे.

नवी मुंबई : शहर व औद्यौगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोकडून माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील अर्जदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेअंतर्गत 26502 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले होते. अंतिम यादीतील आकडेवारीनुसार 21399 अर्जदारांची बुकिंग शुल्क जमा केलं आहे. 

अंतिम यादीत नाव कसं शोधायचं?

सिडकोनं त्यांच्या cidcohomes.com या वेबसाईटवर अर्जदारांची अंतिम यादी ही लिंक उपलब्ध करुन दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास अर्जदारांची नावं पाहायला मिळतात. त्या वेबपेजवर तुमचा अर्जाचा नोंदणी क्रमांक टाकून सर्च करा तुम्हाला तुमचं नाव अंतिम यादीत पाहायला मिळेल. 

26502 घरांसाठी केवळ 21399 अर्जदार

सिडकोनं खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली यासह इतर भागातील घरांसाठी माझे पंसतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. एकूण 26502 घरांची विक्री केली जाणार होती. मात्र,सिडकोनं अनेकदा मुदतवाढ देऊन देखील अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. बुकिंग शुल्क आणि पात्र अर्जदारांची एकूण संख्या अंतिम यादीतून समोर आली आहे. ती संख्या 21399 इतकी आहे. त्यामुळं 26502 घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

माझे पसंतीचे सिडकोचे घरची सोडत कधी?

सिडकोनं माझे पसंतीचे घर योजनेतील अर्जदारांची अंतिम यादी काल प्रकाशित झाली आहे. आता सोडतीचा अंतिम टप्पा बाकी आहे. सिडकोकडून सोडतीसाठी 15 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सकाळी 11.20 वाजता सोडतीचा कार्यक्रम रायगड इस्टेट-फेज I, भूखंड क्रमांक1, सेक्टर-28 , तळोजा पाचनंद येथे होणार आहे. 

सिडकोच्या योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद 

सिडकोनं ऑक्टोबर महिन्यात माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील 26502 घरांच्या विक्रीसाठी अर्ज मागवले. पहिल्यांदा अर्जदारांना नोंदणी करण्यास सांगण्यात आली. त्यानंतर अर्जाचं शुल्क देखील जमा करण्यास सांगण्यात आलं. मात्र, योजनेच्या सुरुवातीला घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. सिडकोच्या घरांच्या किमती निश्चत केल्यानंतर अनेक अर्जदारांना त्या आवाक्याबाहेरच्या असल्यानं त्यांनी पसंतीक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा केलं नाही. सिडकोकडून चार ते पाचवेळा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर 21399 अर्जदारांनी 26502 घरांसाठी अर्ज केल्याचं अंतिम यादीतून स्पष्ट झालं आहे. 

नवी मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोनं ज्या सोयी सुविधा दिल्या जात आहेत त्याचा विचार करता किंमती योग्य असल्याचं म्हटलं होतं. 

इतर बातम्या : 

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क भरण्याची मुदत संपली, अर्जदारांची यादी 'या' दिवशी प्रकाशित होणार? सोडत काही दिवसांवर

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Leopard Attack: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; उपचारादरम्यान मृत्यू
वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस सुरूच!
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा रविवार
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Leopard Attack: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; उपचारादरम्यान मृत्यू
वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 9 वर्षीय रुचीला अक्षरशः फरफटत नेलं; गोंदिया जिल्ह्यात बिबट्याचा हैदोस सुरूच!
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
Maharashtra Live blog: अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा; शरद पवार गटाच्या नेत्याची टीका
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
वर्ल्डकप जिंकणाऱ्या अंध क्रिकेट टीमने घेतली मोदींची भेट; मराठमोळी उपकर्णधार गंगा भावुक
Nagarparishad Election: मोठी बातमी: अवघे काही तास शिल्लक असताना 'या' तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: अवघे काही तास शिल्लक असताना 'या' तीन नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
Gold Rate : सलग दोन दिवस सोन्याचे दर तेजीत, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, नवा उच्चांक गाठणार?
सलग दोन दिवस सोन्याच्या दरात तेजी, सोनं 'या' दोन कारणांमुळं आणखी महागणार, तज्ज्ञ म्हणतात...
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
इथं 150 कोटींचा घपला झालाय, आम्ही कारवाई करतोय; बीडमधून अजित पवारांनी ठणकावलं
Nanded crime: 'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट
'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट
Embed widget