एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWG 2018 : महाराष्ट्रातील पदकविजेत्यांना सरकारकडून रोख इनाम
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक विजेत्यांना 30 लाख, तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रुपयांचं रोख इनाम देऊन गौरवण्यात येईल.
मुंबई : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंना रोख इनाम देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना 50 लाख, रौप्यपदक विजेत्यांना 30 लाख, तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख रुपयांचं रोख इनाम देऊन गौरवण्यात येईल.
पदकविजेत्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना साडेबारा लाख (सुवर्ण), साडेसात लाख (रौप्य) आणि पाच लाख (कांस्य) रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल.
या स्पर्धेत टेबल टेनिसचं सांघिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघात महाराष्ट्राच्या मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे (दोघीही ठाण्याच्या रहिवासी) आणि सनील शेट्टी यांचा समावेश आहे. तसंच भारताच्या सुवर्णविजेत्या बॅडमिंटन संघात मुंबईतील पार्ले भागात राहणाऱ्या चिराग शेट्टीचा समावेश आहे.
त्याशिवाय लग्नानंतर मुंबईतील गोरेगावात वास्तव्य असलेली नेमबाज हीना सिद्धू हिने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावलं आहे.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 24 पदकांची कमाई केली आहे. भारताने 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे संबंधित बातम्या :CWG 2018: Chief Minister Devendra Fadnavis announces cash prize for Maharashtra medalists https://t.co/xZXR0K1LJZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2018
CWG 2018 : श्रेयसीला सुवर्ण, अंकुर आणि ओमची कांस्यकमाई
CWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक
CWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक
CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं
CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’
CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य
CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण
CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण
CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक
CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण
CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement