एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जमावबंदी की, रात्रीची संचारबंदी? आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खलबतांची शक्यता, निर्णयाकडे राज्याचं लक्ष

Cabinet Meeting : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आणि राज्यातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Cabinet Meeting : देशात तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आणि उपाययोजना करण्याचं आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. अशातच जर रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध अटळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढली तर रात्रीची संचारबंदी लावायची की, जमावबंदी लागू करायची? यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा आणि राज्यातील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या? याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण-उत्सव साधेपणानं साजरे करा, असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सत्ताधारी असो किंवा विरोधक, दोघांनीही रस्त्यावर येत आंदोलनं केली. त्यामुळं सर्वसामान्यांनाच कोरोनाची भिती आहे आणि राजकीय पक्षांना नाही? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यामुळं प्रशासनाची जबाबदारी वाढली असून याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे. 

हायकोर्टानंही चिंता व्यक्त केली आहे की, जर आत्ताच आपण काळजी घेतली नाही, तर पुन्हा कोरोनातचा उद्रेक होऊ शकतो. हळूहळू रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे विकेंडला होणाऱ्या गर्दीर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करा. रात्रीची संचारबंदी लागू शकते, असं आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढच्या महिनाभरासाठी काय नियमावली राज्य सरकार जारी करणार याकडे लक्ष असणार आहे. 

राज्यात पुन्हा एकदा काही जिल्ह्यांना पुरानं वेढलं आहे. अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती यामुळे जिवीतहानीसोबतच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झालं आहे. यासारख्या नैसर्गिक आपत्तीबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज 3  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
Embed widget