एक्स्प्लोर

कोस्टल रोडसाठी एका महिन्यात सीआरझेडची परवानगी : मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडसाठी एका महिन्यात पर्यावरण खात्याकडून सीआरझेडची परवानगी मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दिल्लीत पर्यावरण मंत्र्यांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून कांदिवलीपर्यंत होऊ घातलेला कोस्टल रोड विविध परवानग्यांसाठी अडकून पडला आहे. यापूर्वी हेरिटेज समितीने कोस्टल रोडला परवानगी दिली होती. मुंबईशी निगडीत 16-17 पर्यावरण विषयक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. सीआरझेड क्लिअरन्समुळे ज्या झोपड्यांचं पुनर्वसन रखडलंय त्याबाबत लवकरच परवानग्या मिळतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ''महापौरांचं पत्र मिळालं नाही'' मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पत्र पाठवलं होतं. मात्र त्यांचं पत्र मिळालं नाही, मुंबईत गेल्यावर पाहील, असं मुख्यमंत्री म्हणाले. काय आहे सीआरझेड कायदा? सीआरझेड कायद्यानुसार सागरी किनाऱ्यावर बांधकाम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच बांधकामासाठी या कायद्यात विविध निकष आहेत. बांधकाम करण्यासाठी प्रत्येक वेळी केंद्र किंवा राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 19 फेब्रुवारी 1991 रोजी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम तीन अन्वये सीआरझेड हा नवा कायदा लागू केला. उच्च भरतीची रेषा आणि सागरी नियमन विभाग अशी निर्मिती करून याअंतर्गत कुठल्या बाबी करायच्या आणि कुठल्या नाही, हे निश्चित करण्यात आलं. भूखंडाच्या वापराबाबत चार गट करण्यात आले आहेत. मुंबई, गोवा आणि केरळसाठी वेगळे गट स्थापन करण्यात आले असल्याने केंद्राच्या समितीकडून परवानगी घ्यावी लागते. कसा असेल कोस्टल रोड? नरिमन पॉईंट येथील आमदार निवासापासून सुरू होणारा हा 35 ते 36 किलोमीटरचा किनारपट्टीला लागून असलेला रस्ता कांदिवलीत जाऊन मिळणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे शहरातील 18 ठिकाणी उपनगरातील मार्गावर जाण्यासाठी रस्ते तयार होणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. खार ते वर्सोव्यापर्यंत भुयारी रस्ता तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. सागरी सेतूमुळे किनारपट्टीवरील लोकांना सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यास कोणताही अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. म्हणून समुद्रकिनारी लागून 40 ते 60 फुटाचा भाग हा लोकांना फिरण्यासाठी विकसित केला जाणार आहे. सागरी सेतूपेक्षा हा प्रकल्प कमी पैशात होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित बातम्या :

कोस्टल रोडला हेरिटेज समितीचा ग्रीन सिग्नल

कोस्टल रोडचा आराखडा बदलावा लागणार?

 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget