एक्स्प्लोर

Crop Insurance Deadline : पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस, हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांनी काढला विमा

Crop Insurance Deadline : आज पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Crop Insurance Deadline : राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढता यावा म्हणून, राज्य सरकराने 1 रुपयांत विमा काढण्याची योजना आणली आहे. दरम्यान, 31 जुलै पर्यंत पीक विमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही शेतकरी यापासून वंचित राहिल्याने तीन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. तर, आज पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवड ते काढणीपश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरत आहे. तर, सरकारच्या निर्णयानंतर कर्जदार, बिगर कर्जदार, कुळाने अथवा भाडेपट्तीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दरात पीक विमा काढता येतोय. पीक विमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही होती, ती आता केंद्र शासनाने 03 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. 

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात 01 ऑगस्ट अखेर 5 लाख 5 हजार 494 शेतकरी यांनी 3 लाख 20 हजार 82 क्षेत्रावर विमा उतरविला आहे. तालुका निहाय शेतकरी संख्या पाहता औंढा नागनाथ 99 हजार 971, वसमत 1 लाख 14 हजार 469, हिंगोली-91 हजार 071, कळमनुरी-86 हजार 823 आणि सेनगांव 1 लाख 13 हजार 160 या प्रमाणे विमा उतरविला आहे. विमा भरण्याची अंतिम दिनांक 03 ऑगस्ट असून राहिलेल्या शेतकऱ्यांनी सामुहिक सुविधा केंद्र (CSC सेंटर) द्वारे 01 रुपयात विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

नुकसान झाल्यास विमा कंपनीशी साधा संपर्क...

तसेच मागील काही दिवसात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे अथवा मार्गदर्शक सुचनेतील अन्य कारणामुळे ज्या विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी निवड करण्यात आलेली विमा कंपनी एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि. यांच्याकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी त्वरीत इंटिमेशन सादर करायचे आहे. त्यासाठी पत्ता:डी-301 तीसरा मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट (मॅग्नेट मॉल) लाल बहादुर शास्त्री मार्ग,भांडुप (पश्चिम), मुंबई-400078 असा असून संपर्कासाठी टोल फ्री क्र. 18002660700 व ई-मेल-pmfby.maharashtra.@hdfcergo.com  असा आहे. सदरील विमा कंपनीने जिल्ह्यामध्ये कार्यालय देखील स्थापन केले आहे. त्यांच्या कंपनी प्रतिनिधींची माहिती खालील प्रमाणे आहे.

हिंगोली (जिल्हा) यासाठी दिपक बेतिवार (मो. 9911114171) व संतोष सरकटे (मो.7875651137), हिंगोली (तालुका)-श्रीधर बोरकर (मो.8390208459), सेनगाव- संतोष तायडे (8975770177) व संतोष भाकरे (7709670967), वसमत- सगीर नाईक (8329169286) व जाहिद हुसेन (8087889331), औंढा नागनाथ- पवन गायकवाड (8308889773) व रत्नदीप भालेराव (8483802619), कळमनुरी- संतोष बकरे (9158688422) व रवी वाघमारे (9860872329) याप्रमाणे कंपनी प्रतिनिधी आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Crop Insurance : पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून तीन दिवसांची मुदतवाढ; 3 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget