एक्स्प्लोर
अकरावी ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
सर्व बोर्डांचे दहावीचे निकाल लागले असून आता 11 वीसाठी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. परंतु 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक काही प्रमाणात गोंधळलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.
मुंबई : सर्व बोर्डांचे दहावीचे निकाल लागले असून आता 11 वीसाठी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. परंतु 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक काही प्रमाणात गोंधळलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतचा विद्यार्थ्यांसह पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एबीपी माझाने शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे आणि प्रवेश नियंत्रक रमेश देशपांडे यांच्याशी बातचित केली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर अहिरे यांनी दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेताना उपयोगी पडतील.
11 वी ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
1) 11 वी प्रवेशावेळी कोणत्या महविद्यालयांना प्राधान्यक्रम द्यावा?
- 11 वी प्रवेशाचा प्राधान्यक्रम देताना माहिती पुस्तकेतील किंवा वेबसाईटवरील महविद्यालयांची माहिती नीट वाचून त्या महविद्यालयातील एकूण जागा, कॉलेज अनुदानित आहे की विना अनुदानित, त्या कॉलेजचा मागील वर्षीचा कट ऑफ किती होता. याबाबतचा विचार करुनच महविद्यालयांना प्राधान्यक्रम द्यावा
2) आपण किती महविद्यालय प्राधान्यक्रम म्हणून देऊ शकतो?
- आपण कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10 महविद्यालय प्राधान्यक्रमात पर्याय म्हणून देऊ शकतो
3) पहिल्या प्राधान्यक्रमात दिलेले महविद्यालय पहिल्या गुणवत्ता यादीत मिळाले तर त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे का ?
- होय, तुम्हाला पहिल्या क्रमांकाचे महविद्यालय प्राधान्यक्रमात मिळाले असेल तर ते तुम्हला घेणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही प्रवेश फेरी 1 ते 3 मधून बाहेर होऊ शकता
4) विद्यार्थ्याला पहिल्या क्रमांकाचे महविद्यालय मिळाले आणि काही कारणास्तव तो त्या महविद्यालयात प्रवेश घेऊ शकला नाही तर?
- असे झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी 1 ते प्रवेश फेरी 3 पर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. त्याला विशेष फेरीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन उरलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम द्यावा लागेल.
अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा | ABP Majha
5) विद्यार्थ्याला प्राधान्यक्रमात क्रमांक 1 चे महविद्यालय न मिळता क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 चे महविद्यालय पहिल्या फेरीत मिळाले आणि ते महाविद्यालय त्याला नको असल्यास आणि त्याला क्रमांक 1 चे महविद्यालय हवे असल्यास काय करावे?
- पहिल्या फेरीत क्रमांक 1 चे महविद्यालय विद्यार्थ्यांला मिळले नाही, तर तो प्रवेश फेरी 2 साठी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देऊन क्रमांक 1 च्या महविद्यालयासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु, पहिल्या फेरीत मिळालेले क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 किंवा इतर क्रमाकांचे महाविद्यालय हे प्रवेश फेरी 2 मध्ये प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही
6) एकूण किती फेऱ्या असणार? सर्व विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश मिळणार का?
- एकूण 3 प्रवेश फेऱ्या आहेत. त्यानंतर विशेष फेरी असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. कारण पास विद्यार्थ्यांपेक्षा 11 वी साठी जास्त जागा आहेत.
7) एसएससी विद्यार्थ्यांना महविद्यालयात प्रवेशासाठी जागा वाढवण्यात आल्या आहेत, त्याचा फायदा कसा होणार ?
- शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर राज्यभरातील महाविद्यालयांनी 5 ते 10 टक्के जागा वाढवून दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या महविद्यालयात प्रवेश मिळण्याचे मार्ग वाढले आहेत.
8) नामवंत अल्पसंख्याक महविद्यालयातील जागा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कधी खुल्या होणार?
- प्रवेश फेरी 1 ते प्रवेश फेरी 3 नंतर विशेष फेरी दरम्यान अल्पसंख्याक महविद्यालयातील 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या उरलेल्या जागा या खुल्या प्रवर्गासाठी खुल्या करण्यात येतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement