एक्स्प्लोर
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
माणगावमध्ये 3 वाहनांतून गोवंश सदृश्य मांस जप्त करण्यात आलं असून, याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली.

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त करण्यात आलं असून, याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. काल रात्री तीन वाहनांमधून गोमांस सदृश्य मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याचा पाठलाग करत, या तिन्ही वाहनांची तपासणी केली. त्यावेळी या तिन्ही वाहनांमध्ये 4 हजार किलोचं गोवंश मांस असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक करण्यात आलं असून, या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे























