LIVE UPDATES | अखेर गव्याला HEMRL कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश
मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार; संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने निर्णय नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कुठलीही गाईडलाईन नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती अतिवृष्टी नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर; आज औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये आढावा देशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवलं आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत." या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले आहेत. याबाबत लोकांनी आपला संदेश 'MyGov' आणि 'नमो अॅप' वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.
Oppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स?
सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.
Oppo A53 5G च्या 4GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 14,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या 6GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. युजर्सना हा फोन ग्रीन, सीक्रेट नाईट ब्लॅक आणि स्ट्रीमर पर्पल ऑप्शनसोबत खरेदी करता येणार आहे.
Ind vs Aus: भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, मोहम्मद शमी मालिकेबाहेर
ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर झाल्याने शमी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत आहे. त्यामुळे त्याला बॅट उचलणेही शक्य नाही.