(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus: भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, मोहम्मद शमी मालिकेबाहेर
भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट आणि शमीशिवाय मैदनात उतरणार आहे.
Mohammed Shami fractured : ऑस्ट्रेलिया विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा हात फ्रॅक्चर झाल्याने शमी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत आहे. त्यामुळे त्याला बॅट उचलणेही शक्य नाही.
Ind vs Aus: Mohammad Shami out of series with fractured arm Read @ANI Story | https://t.co/eigEzBrVBY pic.twitter.com/akRIN1lejP
— ANI Digital (@ani_digital) December 19, 2020
शमीला झालेली दुखापत हा भारतीय संघसाठी मोठा झटका आहे. भारतीय संघ आता उमेश यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वेगवान गोलंदाजीसाठी अवलंबून आहे. दुसरी कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट आणि शमीशिवाय मैदनात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही दुसऱ्या कसोटी सामन्यात वापसी होण्याची शक्यता कमी आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान थोपवणं कठीण असणार आहे.
संबंधित बातम्या :