LIVE UPDATES | गांजा चरस घेण गुन्हा नाही असं वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात बारामतीतून तक्रार
महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा : आरोग्यमंत्री राजेश टोपे कोलकात्याचा पहिला विजय, हैदराबादवर सात विकेट्सनी मात संजय राऊत अन् देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Maratha Reservation | मराठा समाजाचे 2 ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठा समाजातील युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार घेतले 'हे' निर्णय
सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समजाला दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने सोमवारी (21 सप्टेंबर) विनंती अर्ज दाखल केला आहे.
शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत :
- आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता इडब्लूएस मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी 600 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी 80 कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतीमान करण्यात येईल.
- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी 130 कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल 400 कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.
- मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. शासनाकडे आतापर्यंत फक्त 26 प्रकरणे प्रलंबित आहेत त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
एक कोटी मजुरांनी मार्च ते जूनदरम्यान पायी घर गाठलं, सरकारची संसदेत लिखित माहिती
कोरोना महामारीत संपूर्ण देश संकटात आहे. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. उपजिविकेसाठी विविध राज्यामध्ये असणाऱ्या मजुरांनी लॉकडाऊननंतर स्वगृही परतण्यास सुरुवात केली. मात्र वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने असंख्य मजुरांना रस्त्यावर उतरत पायी घर गाठलं. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च 2020 ते जून 2020 दरम्यान एक कोटीहून अधिक मजुरांनी आपआपल्या राज्यात पायी स्थलांतर केलं, अशी माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत लिखीत स्वरुपात दिली आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, कोविड 19 महामारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मजूरांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलं. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळापास 1.06 कोटी मजुरांनी स्थलांतर केलं, यामध्ये पायी प्रवास केलेल्या मजुरांचाही समावेश आहे.
ड्रग्ज प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्जाचंही नाव समोर आल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी आणि अंकुश यांच्या चौकशीदरम्यान दिया मिर्जाचं नाव समोर आले आहे. एनसीबीजवळ दिया मिर्जाच्या ड्रग्ज खरेदीचे पुरावेही असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दिया मिर्जानं ट्विटरवरुन सर्व आरोप फेटाळलेत.
आपल्या ट्वीटमध्ये दिया म्हणाली, "माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. सर्व आरोपांचं मी खंडन करते.अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे. शिवाय इतक्या वर्षांपासूनमेहनतीनं उभं केलेल्या माझ्या करिअरवर याचा परिणाम होतोय.मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही किंवा खरेदी देखील केले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार."