एक्स्प्लोर
घरात शिरलेलं पाणी उपसताना दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू
रायगड : घरात शिरलेलं पाणी उपसताना शॉक लागून दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील चिरनेर गावात एका दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यू झाला.
मुसळधार पावसामुळे नारंगीकर दाम्पत्याच्या घरात 3 ते 4 फूट पाणी शिरलं होतं. हे पाणी काढताना शॉक लागल्यानंच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
शनिवारी दुपारी रामकृष्ण नारंगीकर यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून न आल्यानं शेजाऱ्यांनी डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना दोघेही जण पाण्यात पडलेले आढळून आले. दरम्यान रुग्णालयात नेलं असता नारंगीकर दाम्पत्याला मृत घोषित करण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement