प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वर्ध्यातील समुद्रपूरमधील घटनेने खळबळ
Wardha News Update : प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वर्ध्यातील समुद्रपूरमधील कुर्ला गावात ही घटना घडली आहे.
Wardha News Update : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर दोघांनीही विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातल्या कुर्ला गावात उघडीस आली आहे. आत्महत्या केलेलं प्रेमीयुगुल नागपूर जिल्ह्यातील बेला गावातील आहे.
मुलगी घरून हरवल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत केली होती. दरम्यान फोनवरून या प्रेमयुगलाने कुटुंबीयांना पळून आल्याची माहिती दिली. यावेळी कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. फोन लोकेशनवरून हे दोघे कुर्ला गावच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे कुटुंब घटनास्थळी पोहचले. दूरवरून घरची मंडळी दिसताच या प्रेमयुगाने विहिरीत उडी घेतली. कुटुंबीयांनी दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहिरीतील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील बेला येथील 26 वर्षीय महेश शालिक ठाकरे आणि 15 वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. मुलाने फोनवरून मुलीच्या आणि आपल्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यावेळी कुटंबातील सदस्यांनी त्यांना परत येण्याची विनवणी केली. परंतु, आमचे प्रेमसंबंध तोडले जातील, आम्हाला जेलमध्ये टाकाल, त्यामुळे आम्ही परत येणार नाही, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. मुलाने केलेल्या फोन लोकेशनवरून नातेवाईक कुर्ला येथे पोहचले. यावेळी ते दोघे कुर्ला शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ उभा होते. कुटुंबातील सदस्यांनी दूरूनच दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघांनीही विहिरीत उडी घेतली. त्यामुळे कुटंबीयांनी तत्काळ दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहिरीत जास्त गाळ असल्यामुळे हे दोघेही गाळात फसले. त्यामुळे अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
या घटनेनंतर कुटंबीयांनी याची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे यांना दिली. माहिती मिळताच काळे यांनी सहकारी पोलीस कर्मचारी विक्की मस्के आणि प्रमोद जाधव यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून प्रेमीयुगुलाचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Crime News : कोरोना काळात लावले अनेक बोगस लग्न, राज्यात फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय
Pune Crime : पुण्यातील बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या तीन घटना
Bulli Bai: बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरण: आरोपींना सशर्त जामीन मंजूर