Bulli Bai: बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरण: आरोपींना सशर्त जामीन मंजूर
Sulli Deals : बुल्ली बाई आणि सुली डील्स अॅप प्रकरणातील दोन आरोपींना दिल्ली कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Sulli Deals : अॅपद्वारे अल्पसंख्याक महिलांची बदनामी करणाऱ्या आरोपींना दिलासा मिळाला आहे. बुल्ली बाई अॅप प्रकरणातील आरोपी नीरज बिष्णोई आणि सुली डील्स अॅप तयार करणारा ओंकारेश्वर ठाकूर याला मानवीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला. दिल्लीतील कोर्टाने हा सशर्त जामीन मंजूर केला. आरोपींनी पहिल्यांदा गुन्हा केला आहे, त्यामुळे तुरुंगवासात राहिल्यास त्यांच्यादृष्टीने हानीकारक ठरू शकते असेही कोर्टाने म्हटले.
कोर्टाने जामीन देताना आरोपींसमोर काही अटी ठेवल्या आहेत. कोणत्या साक्षीदाराला न धमकावणे, पुराव्यांसोबत छेडछाड करू नये या अटी ठेवल्या आहेत. आरोपीने कोणत्याही पीडित व्यक्तीला संपर्क करणे, त्यांना आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करू नये अशा स्पष्ट सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
या अटींचे करावे लागेल पालन
जामीनावर असताना आरोपीने आपला संपर्क क्रमांक आणि वास्तव्याची माहिती अधिकाऱ्याला द्यावी. आरोपी आपला फोन कायम सुरू ठेवणार, तसेच आपल्या ठावठिकाण्याची माहिती देईल. आरोपीने देश सोडू नये आणि प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर रहावे लागणार. जामिनावर असताना आरोपीने असा गुन्हा करू नये असेही आरोपींना बजावण्यात आले आहे.
काय आहे 'सुली डिल्स' अॅप?
सुली हा मुस्लिम महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. 4 जुलै 2021 रोजी ट्विटरवर सुली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. अॅपवर 'सुली डील ऑफ द डे' अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. हे फोटोही 'गिटहब' (Github) अॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती, मात्र अनेक महिने त्यावर कारवाई झाली नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 1600 किलोमीटर पाठलाग करून बीड पोलिसांनी कुख्यात चेन चोरांच्या मुसक्या आवळल्या
- एका पॉलिथिन आणि थर्मोकोलच्या काही तुकड्यांवरून बस कंडक्टरच्या हत्येचा उलगडा, संशयितांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha