एक्स्प्लोर

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

सातारा : सैराटमधील रक्ताळलेल्या ठशांनी मनावर खोल जखम केली, ज्यावर खपली धरण्याआधी साताऱ्यात 'सैराट'शी साम्य असणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून पती-पत्नीही दोघेही बचावले. तसंच दोन वर्षांचा मुलगा शेजारी गेल्याने तो सुखरुप आहे.     गजवडी गावातील विनायक कदम आणि उषा यांचा प्रेमविवाह झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा विरोध झुगारुन त्यांनी चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि साताऱ्याबाहेर राहत होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.     यात्रेनिमित्त हे पती-पत्नी गावात आले होते. याची माहिती मिळल्यानंतर उषा यांच्या नातेवाईकांनी कुऱ्हाड आणि दांड्यांसह विनायक कदम यांच्या घरावर हल्ला केला.   Satara_Attack मुलीचे कुटुंबीय येत असल्याचं समजताच त्यांनी घराचा पुढचा दरवाजा आतून लावला. परंतु हल्लेखोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि विनायक-उषा यांच्यासह घरातील सगळ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुदैवाने हे दाम्पत्यांने तिथून कसाबसा शेताच्या दिशेने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी विनायकच्या कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांना जखमी केलं.     महत्त्वाची बाब म्हणजे आजीने दोन वर्षांच्या मुलाला बाहेर नेलं होतं, म्हणून त्याचा जीव वाचला.     घटनेची माहिती मिळताच पोलिस तिथे दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. शंकर कदम, अश्विन कदम, दिनकर कदम, नामदेव कदम, लता कदम, अनिता कदम अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर यातील एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.   या घटनेनंतर गजवडी भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget