एक्स्प्लोर

कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; राज्यात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची मागणी वाढली

Oxygen demand rise amid coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे.

Coronavirus Updates : मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, त्याच्या परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची मागणी होती, दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची मागणी वाढली होती. कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांटही उभारण्यात आले, त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

राज्यात कोरोनाची लाट पुन्हा एकदा धडकणार असल्याचे चित्र असताना दुसरीकडे ऑक्सिजनची मागणी वाढणार असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याला सध्या 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज सध्या लागत आहे. कोरोनाबाधितांवरील उपचाराशिवाय इतर रुग्णांसाठी साधारणपणे किमान 200 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते. ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा झालेल्या रुग्णांपैकी फार कमी जणांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र, वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यात आले असून गरज भासल्यास तातडीने वाहतूक करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

राज्यात शुक्रवारी तब्बल  40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.  शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971  रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून हजारांच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या शुक्रवारी फक्त 790 ने वाढली होती. त्यामुळे बाधितांच्या संख्या वाढ स्थिरावल्याचे समोर आलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Embed widget