एक्स्प्लोर

#Markaz | निजामुद्दीन 'मरकज'साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं : गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोना संसर्गाचं दिल्लीतील केंद्र ठरलेला निजामुद्दीन परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित केला आहे. 'मरकज' आयोजित केलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. राज्यातील अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या लोकांना स्वत:हून पुढे येऊन सांगणे गरजेचे आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

मुंबई : निजामुद्दीन मधील हे मरकज दिल्लीत कोरोना संसर्गाचं केंद्र ठरलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात आयोजित मरकज कार्यक्रमात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लोकांनी सहभाग घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खाते आणि राज्यातले गृह खाते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिल्लीत शंभरापेक्षा जास्त लोक निजामुद्दीनमधील या कार्यक्रमाला राज्यातून सहभागी झाले होते. मरकज कार्यक्रमाला गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं, असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील त्यातील काहीजण संपर्कात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात कोरोना बाधित झाले आहेत का? याबाबत टेस्टसाठी नेण्यात येत आहे. राज्यातील गृह मंत्रालय हे केंद्रीय गृहमंत्रालय संपर्कात असून केंद्र सरकारच्या समन्वयाने सर्व माहिती घेऊन संबंधित लोकांशी संपर्क करत आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं. दिल्लीतील निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील अनेकांचा सहभाग, सर्वांचा शोध सुरु जे लोक या कार्यक्रमात सहभागी होते त्यांनी स्वत: पुढे येऊन सांगणे गरजेचे आहे. त्या काही लोकांमुळे इतर लोकांना विनाकारण त्रास नको असं देखील गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. Coronavirus | Nizamuddin Markaz | दिल्लीतील निजामुद्दीन मरकज परिसर पोलिसांकडून सील मरकज म्हणजे काय? दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.) Special Report | निजामुद्दीनमधून देशभरात कसा पसरला कोरोना? 24जण पॉझिटिव्ह, 334रुग्णालयात, 700क्वॉरंटाईन राज्यातून मरकजसाठी गेलेल्यांचा शोध सुरु दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे.  महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.  मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे.  सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता.  अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget