Coronavirus LIVE UPDATE | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टेनिसची विम्बल्डन स्पर्धा रद्द
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील हजाराच्या वर आकडा गाठला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 302 वर गेला आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरूचं आहे. आज दिवसभरात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या बातम्या कानावर येत आहे. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही. फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे. वेतन कपात केली आहे, असा गैरसमज करू नका फक्त आपल्याला आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी ही मांडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणाचाही पगार कापला जाणार नाही.
सध्या उन्हाळा सुरु आहे. गरमी वाढली म्हणून एसी लावू नका, थंड पेय टाळा, थंड पाणी किंवा सरबत पिऊ नका. हे कोरोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तो देखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.