एक्स्प्लोर

#Coronavirus | महाराष्ट्र लॉकडाऊन! संपूर्ण राज्यात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू : मुख्यमंत्री

संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत.

मुंबई : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणाकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

कोरोना व्हायरसच्या संवेदनशील टप्प्यात आपण आहोत. त्यामुळे लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे. लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.

महाराष्ट्र लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तूची दुकानं खुली राहतील. यामध्ये औषध, धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील.  बँका, वित्तीय संस्था देखील सुरूच राहतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्द
  • आज मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू. पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
  • जी जिद्द आज आपण दाखवली आहे, ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
  • रेल्वे, खासगी बसेस, एसटी बसेस बंद राहणार.
  • जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील.
  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील.
  • बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील.
  • शासकीय कार्यालयात आता केवळ 5 टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
  • आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद राहणार.
  • ज्यांचं घरीच विलगीकरण केलेले आहे, त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून 15 दिवस घराबाहेर पडू नका. घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
  • चाचणी केंद्रे आपण वाढवत आहोत.
  • लॉकडाऊन 31 मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल.
  • सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा सुरु राहील, पण भाविकांसाठी बंद राहणार.
  • माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget