(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CORONAVIRUS UPDATES | गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 186 वर पोहोचली आहे. गुरुवारी (26 मार्च) दिवसभरात मुंबईचे 22 जण , पुण्याचे 4, नागपूरचे 2, जळगावचा 1 आहे. तर 4 रूग्ण पालघर, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरतील आहे. तर नागपूर, सांगली जिलह्यातील इस्लामपूरमधील रुग्णांना समूह संसर्गातून कोरोना झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 935 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासात 149 नवे रूग्ण आढळले असून आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त केरळमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारत सध्या दुसऱ्या स्टेजला आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 186
मुंबई – 73
पुणे – 23
पिंपरी-चिंचवड – 12
सांगली – 24
नागपूर – 11
कल्य़ाण-डोंबिवली – 7
नवीमुंबई – 6
ठाणे – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
पनवेल – 2
सातारा – 2
उल्हासनगर – 1
वसई-विरार – 1
पालघऱ – 1
सिंधुदुर्ग – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
देशातील कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढत आहे. वाढता ग्राफ पाहता आरोग्य मंत्रालयाने 40 हजार व्हेंटीलेटरची ऑर्डर दिली आहे. यापैकी 30 हजार व्हेंटीलेटर हे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात येणार आहे. तर HLL कडून 10 हजार व्हेंटीलेटर घेण्यात येणार आहे.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
सर्वाधिक पाच मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर गुजरात 3, कर्नाटकमध्ये 2 बळी गेले आहेत. याशिवाय दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारकडून जागरुकतेसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला वारंवार दिला जात आहेत.