CORONAVIRUS UPDATES | बाजार समिती बंद ठेवू नका, पणन संचालनालयाचे परिपत्रक, शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.
पिंपरी चिंचवडमधील 21 वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. रत्नागिरीतील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. तर अमेरिकेहून आलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
- पुणे - 8
- पिंपरी-चिंचवड - 11
- मुंबई - 8
- नागपूर - 4
- यवतमाळ - 3
- कल्याण - 3
- नवी मुंबई - 3
- रायगड - 1
- ठाणे - 1
- अहमदनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी- 1
राज्यात कोरोना व्हायरस संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या 15 दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच उद्यापासून तीन ठिकाणी कोरोना व्हायरसची तपासणी सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील, या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.