Corona LIVE UPDATE | शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वॉरंटाईन करण्याची मागणी
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील तीन हजाराच्या वर आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
LIVE
Background
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 229 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 490, केरळमध्ये 295, तामिळनाडूमध्ये 411, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 164, राजस्थानमध्ये 179, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 174, मध्यप्रदेशात 154रूग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली, दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांना ट्रॅक करण्यात आलं आहे. या लोकांचा संबंध तब्लिकींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कोरोनाटी लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.