LIVE UPDATES | राज्यात आज 1672 रुग्ण कोरोनामुक्त, तर दिवसभरात 100 जणांचा मृत्यू
राज्यात बुधवारी (17 जून) 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.68 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1315 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 59 हजार 166 झाली आहे. परत लॉकडाऊन लावणार ही अफवा आहे. आता आपण फक्त अनलॉकिंगविषयी बोलणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
राज्यातील कोरोनाची परिस्थिती
राज्यात बुधवारी (17 जून) 3307 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.68 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1315 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 59 हजार 166 झाली आहे. सध्या राज्यात 51 हजार 921 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात 114 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. यासह आतापर्यंत 5651 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 77, मीरा भाईंदर 1, जळगाव 7, नंदूरबार 2, मालेगाव 2, पुणे 3, पुणे मनपा 18, पिंपरी चिंचवड 1, लातूर 2, यवतमाळमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
परत लॉकडाऊन लावणार ही अफवा आहे. आता आपण फक्त अनलॉकिंगविषयी बोलणार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये म्हणाले. काही राज्यांत प्रादुर्भाव आहे. गर्दी, लोकसंख्या, वाहतूक यामुळे आपल्यासमोरचे आव्हान मोठ आहे. तरीही प्रशासनाने प्रयत्न केल्याने, कोविड योद्ध्यांमुळे आणि लोकांच्या सहकार्याने संक्रमणातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होते आहे. आयसीयूचा कमी वापर करावा लागतोय. जनतेने विषाणूच्या गुणाकाराला रोखले आहे. उपचार, प्रशिक्षित मनुष्यबळ, साधन सामुग्रीची इतर देशांशी तुलना केली तर आपण चांगल्या परिस्थितीत आहोत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
गेल्या दोन अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असताना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करुन अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
निषेध करताना चीनचा उल्लेखही का नाही, राहुल गांधींचा संरक्षणमंत्र्यांना सवाल
जवानांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यात चीनचा उल्लेखही का नाही, असा प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झालेत. या घटनेवर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रुपानं तब्बल 36 तासानंतर पहिली सरकारी प्रतिक्रिया आली. त्यावर राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. राजनाथ सिंह यांनी जवानांना श्रद्धांजली वाहणारं जे ट्विट केलं आहे, त्यात चीनचा उल्लेखही नसणं हा जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. जर खरोखर इतक्या वेदना झाल्या असतील तर अशी सुरुवात करुन राहुल गांधींनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात त्यांचा पुढचा प्रश्न आहे की जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन दिवस का लागले? जवान शहीद होत असतानाही राजकीय सभा का सुरु ठेवल्या जातायत?