coronavirus | राज्य सेवा आयोगाची परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 26 एप्रिलला होणारी परीक्षा आणि 10 मे ला होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 26 एप्रिलला होणारी परीक्षा आणि 10 मे ला होणारी दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. या दोन्ही परिक्षांच्या तारखा उमेदवारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल असंही राज्य सेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच उमेदवारांनी वेळोवेळी आयोगाची वेबसाईटही चेक करावी असं सांगण्यात आलं आहे.
Coronavirus | एमपीएससी पूर्वपरीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित, SMS द्वारे तारीख कळवणार
एमपीएससीची पूर्वपरिक्षा आधी 4 एप्रिलला होणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ती पुढे ढकलून 26 एप्रिल रोजी घेण्यात येईल असं सांगण्यात आलं. आता मात्र 26 एप्रीलपासून पुर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.