एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोनाची घाबरवणारी आकडेवारी, पाच दिवसात हजारो लोकांचा मृत्यू

जगभरात गेल्या पाच दिवसात कोरोना व्हायरसमुळे जवळपास साडेचार हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदरही 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनेक मोठे प्रगत देश या महामारीसमोर हतबल झालेले दिसत आहेत.

मुंबई : जगभरात कोरोनाने अक्षरश: थैमान घातलं आहे. रोज शेकडो लोक कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसातील जगभरातील मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हा व्हायरस किती भयंकर आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. जगभरात कोरोनाचे साधारण 3 लाख 37 हजार रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 14 हजार 616 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसातील आकडेवारी घाबरवणारी आणि चिंता वाढवणारी आहे. नव्या आकडेवारीनुसार रोज मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

18 मार्च जगभरातील कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 8951 एवढी होती. मृत्यूदर 9.49 टक्के होता.

19 मार्च जगभरातील मृतांचा आकडा 10,031 वर पोहोचला. मृत्यूदरही वाढून 10.22 टक्के झाला.

20 मार्च जगभरातील मृतांचा आकडा 11,387 झाला. यावेळी मृत्यूदर 11.06 टक्के होता.

21 मार्च जगभरातील आकडा 1626 ने वाढला आणि मृत्यांची संख्या 13,013 वर पोहचली. मृत्यूदर 12 टक्क्यांवर पोहोचला.

22 मार्च भारतात जनता कर्फ्यू लागू होता. त्यावेळी जगभरातील मृतांचा आकडा 14,615 वर गेला आणि मृत्यूदर 13 टक्के झाला.

पाच दिवसात साडेचार हजार रुग्णांचा मृत्यू

वरील आकडेवारीवर नजर टाकल्यास अवघ्या पाच दिवसात जवळपास साडेचार हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील ही आकडेवारी असली तरी ती भारतासाठी चिंतेंची बाब आहे. आपण जेवढा विचार करतोय त्यापेक्षा वेगाने हा व्हायरस पसरतो आहे.

चीन, इराण, इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांकडून भारताला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. या देशांनी केलेल्या चुका टाळणे भारतातसाठी गरजेचं आहे आणि शक्य आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. झपाट्याने पसरत असलेल्या या व्हायसर पुढे अमेरिका, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलियासारखे अनेक मोठे देश हतबल दिसत आहेत. वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिल्यानंतर कुणाला वाचवायचं आणि कुणाला नाही, असा प्रश्न डॉक्टरांना पडत असल्याचं चित्र आहे.

भारतातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी सरकारच्या आवाहनाला आणि निर्णयांना पाठिंबा देणे गरजेचं आहे. सरकार आणि डॉक्टर जे सांगत आहेत, ते सर्वांनी ऐकलं पाहिजे. असं केलं तरच कोरोनाविरोधातील ही लढाई भारताला जिकणं शक्य होईल, अन्यथा कोरोनाचं पुढचं टार्गेट भारत असू शकतं.

संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget