Coronavirus Cases In Maharashtra : पुन्हा कोरोना रुग्ण वाढतायेत, शनिवारी राज्यात 480 नव्या रुग्णांची नोंद
Coronavirus Cases In Maharashtra : सणासुदीच्या काळात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे.
Coronavirus Cases In Maharashtra : सणासुदीच्या काळात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी राज्यात 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे. शुक्रवारच्या तुलनेत राज्यात 100 पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यातील 521 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,73,675 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 89.15 % एवढे झाले आहे. आज राज्यात 480 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 81 लाख 24 हजार 299 इतकी झाली आहे. राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या दोन हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात कुठे किती सक्रिय रुग्ण ?
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये सध्या 792 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 542 सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात 295 सक्रिय रुग्ण आहेत. तर नागपूरमध्ये 107 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये सध्या 100 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. धुळे आणि परभणीमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही. तर सिंधुदुर्ग, सांगली, जळगाव, नंदुरबार, बीड, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये दहापेक्षा कमी सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
आज कुठे किती रुग्ण आढळले?
राज्यात आज 480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई आणि पुण्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये आज 130 नवीन कोरोना रुग्णांची नोंद जाली आहे. राज्यात आज सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळळे आहेत. इतर ठिकाणी रुग्णांची संख्या 100 पेक्षा कमी आहे. पुणे 24, पुणे मनपा 56, पिंपरी चिंचवड 49, नवी मुंबई 38 रुग्ण आढळले आहेत. उल्हासनगर, भिवंडी मनपा, मालेगाव, धुळे, धुळे मनपा, जलगाव, जलघाव मनपा, सोलापूर मनपा, सांगली मनपा, सांगली, हिंगोली, परभणी, परभणी मनपा, बीड, यवतमाळ, बुलढाणा आणि गडचिरोली या ठिकाणी आज एकही कोरोना रुग्ण आढळळा नाही.