एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यात आज 522 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 8590

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8590 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 522 ने वाढला आहे. तर दिवसभरात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 522 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8590 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 15 जण मुंबईचे तर पुण्यातील 4 आणि अमरावती शहरातील 6 तर जळगाव आणि औरंगाबाद येथील येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (अमरावती शहरातील मृत्यू 20 ते 25 एप्रिल या कालावधीतील आहे). राज्यात आतापर्यंत 369 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 94 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 21 हजार 562 नमुन्यांपैकी 1 लाख 12 हजार 552 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 8590 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 677 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 9399 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1282 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 15 पुरूष तर 12 महिला आहेत. त्यातील 13 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर सहा रुग्ण 40 वर्षांखालील आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 8590

मृत्यू - 369

मुंबई महानगरपालिका- 5776 (मृत्यू 219)

ठाणे- 40 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 295 (मृत्यू 4)

नवी मुंबई मनपा- 135(मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली- 145 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा - 2

भिवंडी, निजामपूर - 14

मिरा-भाईंदर- 121 (मृत्यू 2)

पालघर- 25 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 121(मृत्यू 3)

रायगड- 18

पनवेल- 43 (मृत्यू 1)

नाशिक - 4

नाशिक मनपा- 19

मालेगाव मनपा - 123 (मृत्यू 12)

अहमदनगर- 26 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा - 16

धुळे - 8 (मृत्यू 2)

धुळे मनपा - 17 (मृत्यू 1)

जळगाव- 18 (मृत्यू 4)

जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)

नंदुरबार - 11 (मृत्यू 1)

पुणे- 58 (मृत्यू 3)

पुणे मनपा- 969 (मृत्यू 74)

पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)

सातारा- 29 (मृत्यू 2)

सोलापूर- 6

सोलापूर मनपा- 59 (मृत्यू 5)

कोल्हापूर- 7

कोल्हापूर मनपा- 4

सांगली- 26

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 1

रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)

औरंगाबाद -1

औरंगाबाद मनपा- 51 (मृत्यू 6)

जालना- 2

हिंगोली- 8

परभणी मनपा- 1

लातूर -10 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड मनपा - 3

अकोला - 11 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 18

अमरावती- 1

अमरावती मनपा- 21 (मृत्यू 7)

यवतमाळ- 62

बुलढाणा - 21 (मृत्यू 1)

वाशिम - 1

नागपूर- 4

नागपूर मनपा - 123 (मृत्यू 1)

भंडारा - 1

चंद्रपूर मनपा - 2

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 572 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7861 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 32.28 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Coronavirus | हिंगोलीत SRPFच्या चार जवानांना कोरोनाची लागण

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget