Corona Vaccination For Children : मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद, 15 ते 18 वयोगटातील 37 लाख 84 हजार जणांचं लसीकरण
Corona Vaccination For Children : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना देशात आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु झाले आहे. आज संध्याकाळपर्यंत 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतला आहे.
Corona Vaccination For Children : महाराष्ट्रासह देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय. पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतलाय. जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहेत. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय. मुंबईत जवळपास नऊ लाख मुलांना लस दिली जाणार आहे. पुण्यात चाळीस तर पिंपरी चिंचवडमध्ये आठ लसीकरण केंद्रावर मुलांचं लसीकरण होणार आहे. नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मुलांचं लसीकरण अभियान सुरु झालंय. शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर मुलांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
करण्यात येतंय.
COVID19 | 37,84,212 children in 15-17 age group vaccinated till 7pm as on the first day of COVID19 vaccination for children, as per CoWIN portal pic.twitter.com/76cpSeCA6v
— ANI (@ANI) January 3, 2022
CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)
लहान मुलांसाठी COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जानेवरी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल.