Corona Vaccination For Children LIVE : मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात, पाहा लाईव्ह अपडेट्स
Corona Vaccination For Children Latest updates : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना देशात आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे.
LIVE
Background
Corona Vaccination For Children : देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे, यासंदर्भातील घोषणा काही दिवसांनी पंतप्रधानांनी केली होती. यासाठी आधीपासून कोविन अॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लोकांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. आजपासून म्हणजेच, 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला असून तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे.
CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)
लहान मुलांसाठी COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जनवरी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल.
लसीसाठी कोविन पोर्टलवर नोंदणी कशी कराल?
- कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
- नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
- वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
- त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
- लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
- पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
- तुम्ही जिल्हावार किंवा तुमच्या शहरानुसार यादीही शोधू शकता.
- तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
- तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.
- लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आलंय. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झालं तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे.
लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 हजार 500 व्यक्तींच्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात आलंय. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनाही प्रशिक्षण देण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे, लसीकरणानंतर लहान मुलांना काही रिअॅक्शन झालं तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्डचा वापर करण्यात येईल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहिम हातात घेईल. प्रायोगिक तत्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर कोणतेही गंभीर रिअॅक्शन झाली नसल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Corona Vaccination : मुलांचे लसीकरण का गरजेचे आहे? काय आहेत फायदे? तज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
- Florona: ओमायक्रॉननंतर जगासमोर आता प्लोरोनाचं संकट! इस्रायलमध्ये आढळला पहिला रुग्ण; कोरोना- इन्फ्लूएंझाचा डबल इन्फेशक्शन असल्याचा दावा
- Coronavirus Testing : कोरोना चाचणीसाठी 24 तास बूथ उभारा, केंद्राचे राज्यांना आदेश
पंढरपुरात लसीकरणासाठी आरोग्य विभाग थेट शाळेत पोहोचला, शहरातून सुरु न करता ग्रामीण भागात सुरु केल्याने विद्यार्थी हुडकण्याची वेळ
आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण; पहिल्याच दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत 12 लाख मुलांना लस
आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत 12 लाख 91 हजार 532 मुलांना लस दिली जाईल. CoWin वेबसाइटवरील डेटानुसार, 12 लाख (12,69,338) मुलांना त्यांचा पहिला डोस सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत, 15-18 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी मिळाला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलामुलींना लसीकरणाला सुरुवात
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ८ ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून जिल्ह्यातील ४० हजार मुलामुलींना ८ केंद्रांवरील लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना १५ जानेवारीपर्यंत लसीकरण पूर्ण केलं जाईल अशी माहिती डॉ महेश खलीपे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
गोंदियात 49 केंद्रावर लसीकरण, 68 हजार बालकांना कोरोना लस दिली जाणार
Jalna vacations : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
Jalna vacations : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण : ABP Majha