Corona Vaccination : मुलांचे लसीकरण का गरजेचे आहे? काय आहेत फायदे? तज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
देशभरात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. शिवाय लहान मुलांच्या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे.
Corona Vaccination : देशभरात कोरोना (Corona cases) रूग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरणाचा (Vaccination) वेग देखील वाढवण्यात आला आहे. शिवाय लहान मुलांच्या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. त्यासाठी आजपासून (दि. 1 जानेवारी 2022) नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता हे लसीकरण का गरजेचे आहे? त्याचे फायदे काय आहेत? याबाबत एबीपी न्यूजसोबत एलएनजेपी रूग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुरेश कुमार यांनी संवाद साधला आहे.
याबाबतची माहिती देताना डॉ. राजेश कुमार म्हणाले, मुलांचे लसीकरण करण्याचे खूप महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कारण नुकतीच शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यातच आता ओमायक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर हे लसीकरण अत्यंत आवश्यक आणि खूप महत्वाचे आहे. ओमायक्रॉनचा प्रसार खूप वेगाने होत आहे. 15 ते 18 या वयोगटाची 8-9 कोटी लोकसंख्या आहे. त्यांना त्याचा फायदा होणार आहे.
सुरूवातीला कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची द्विधा मनस्थिती होती. तुम्हाला असे वाटते का की पालकांच्या मनात अजूनही ती भीती किंवा संकोच असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. राजेश कुमार म्हणाले, "आपल्याकडे देण्यात येत असलेली लस भारतातच उत्पादित केलेली जागतिक दर्जाची लस आहे. सुरक्षितता आणि परिणामकारकतेबाबत कोणतीही अडचण नाही. तिची सुरक्षितता खूप मोठ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये तपासण्यात आली आहे आणि लहान मुलांवरही क्लिनिकल ट्रायल्स यशस्वी झाल्या आहेत. यामुळे मुलांना लसीकरणाची मदत होईल. लसीकरणापासून मुलांना कोणताही धोका नाही. शिवाय बरेच लोक अफवा पसरवतील की मुलांना रिएक्शन होईल किंवा इतर समस्या उद्भवतील. परंतु, असे काहीही होणार नाही. नागरिकांनी अफवांवर लक्ष देऊ नये.
डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, मुलांचे लसीकरण लवकरात लवकर होणे गरजेजे आहे. कारण आमच्याकडे ओमायक्रॉनची लागण झालेली तीन मुले दाखल झाली होती. त्यांच्यामध्ये ओमायक्रॉनची लक्षणे होती. आमच्याकडे दाखल झालेल्या मुलांमधील एक मुगला 9 वर्षाचा होता, दुसरा 14 वर्षांचा होता तर तिसरा मुलगा 16 वर्षांचा होता.
लसीकरणामुळे धोका कमी
लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्याला अॉक्सीजनची गरज लागत नाही, शिवाय आयसीयूची पण आवश्यकता लागत नाही. त्यामुळेच मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या